लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवलं, केंद्राचा मोठा निर्णय

लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवलं, केंद्राचा मोठा निर्णय

Published by :
Published on

लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय केवळ कोविशिल्ड लसीसाठीच लागू असणार आहे.केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार गटाने हा सल्ला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर आता केंद्र सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार गटानं यासंदर्भात सल्ला दिला होता. त्यानुसार आता केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवडे इतकं होतं. आता ते अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. म्हणजे आता पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस थेट १२ ते १६ आठवड्यांनंतर म्हणजेच ३ ते ४ महिन्यांनंतर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाकडे अर्थात नेशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑफ वॅक्सिनेशन अॅडमीस्टरेशनकडे पाठवण्या आल्या होत्या. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, कोवॅक्सिन लसीच्या डोससाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com