अनिल देशमुखांची सुटका नाहीच; ईडी कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ

अनिल देशमुखांची सुटका नाहीच; ईडी कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ

Published by :
Published on

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या ईडी (ED) कोठडीत वाढ करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात आला असून न्यायालयाने १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपत होती. त्या पार्श्वभूमीवर आज विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी सुरू होती. ईडीने अनिल देशमुखांची कोठडी वाढवून मागितली होती. तर, अनिल देशमुखांच्या वतीने कोठडीला विरोध करत युक्तिवाद केला. मात्र, आम्हाला केवळ त्यांचा जबाब नोंदवायचा आहे. त्यामुळे किमान दोन दिवस ईडी कोठडी वाढवावी, अशी माहिती ईडीकडून कोर्टात देण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com