Income Tax: आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! दोन वर्षांपूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी मिळणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प असून गेल्यावर्षीसारखे यावर्षी देखिल निर्मला सीतारामन या टॅबच्या माध्यमातून अर्थसंकल्प मांडला.
या अर्थसंकल्पात आयकर भरणाऱ्या करदात्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली की, करदात्यांकडून फॉर्म भरताना एखादी चूक झाली तर त्यांची चौकशी होत होती. आता यापुढे ते बंद होणार असून त्यात गेल्या दोन वर्षातील चुकांची सुधारणा करण्याची संधी देण्यात येणार आहे.
ही घोषणा करताना निर्मला सितारामण म्हणाल्या की, "या आधी आयकर परतावा फाईल म्हणजे आयकर रिटर्न भरताना काही चूक झाली तर त्या करदात्याची चौकशी करण्यात येत होती. पण आता केंद्र सरकारने या करदात्यांवर पूर्ण विश्वास ठेवण्यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पुढे काही चुका झाल्या तर त्याची चौकशी होणार नाही. त्या चुकामध्ये सुधारणा करण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे."
ही घोषणा लाखो करदात्यांसाठी महत्वाची आहे. केंद्र सरकारने सहकारी सोसायट्यांसाठी असणारा किमान पर्यायी कर (alternate minimum tax) टॅक्स हा 18.5 टक्क्यांवरून 15 टक्के इतका केला आहे.