इम्रान खान
इम्रान खानTeam Lokshahi

इम्रान खान यांचा मास्टर स्ट्रोक; अविश्वास प्रस्ताव रद्द

पाकिस्तानात ९० दिवसांच्या आत नव्यानं निवडणुका होणार.
Published by :
Sudhir Kakde
Published on

पाकिस्तानात (Pakistan) सुरु असलेला राजकीय घुसळन थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) रद्द करण्यात आला आहे. आज त्यांच्या अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार होतं. मात्र त्यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय उप सभापतींनी घेतला आहे. तसंच येणाऱ्या काही दिवसांतच पाकिस्तानात निवडणुका पार पडणार असल्याती माहिती मिळतेय.

पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी या निर्णयाचा विरोध करत हे घटनेचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसांत पाकिस्तानात आणखी काय राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे येणाऱ्या ९० दिवसांच्या आत पाकिस्तानात निवडणुका होणार आहेत.

पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्याविरुद्धचा हा अविश्वास प्रस्ताव म्हणजे विदेशी षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. परकीत शक्ती पाकिस्तानचं भवितव्य ठरवणार नाही असा इशारा इम्रान खान यांनी दिला आहे. दरम्यान, इम्रान खान यांना समर्थन दिलेल्या मुत्ताहिदा कौैमी मुव्हमेंट या पक्षाने समर्थन काढून घेतलं आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्याकडे बहुमत नसल्याने पाकिस्तानात नव्यानं निवडणुका होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com