कोरोनाने दगावणाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत अशक्य

कोरोनाने दगावणाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत अशक्य

Published by :
Published on

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्व कुटुंबियांना ४ लाख रुपयांची भरपाई देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. जर प्रत्येक कोरोना मृत्यूसाठी 4 लाख रुपये देण्याची सूचना राज्यांना देण्यात आली तर त्यांचा संपूर्ण निधी संपून जाईल. त्यामुळे कोरोनाशी सामना करण्यासाठी त्यासोबतच पूर, चक्रीवादळ यासारख्या आपत्तींशी लढणेही अशक्य होईल असेही प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.

सध्या केंद्र व राज्यांना कमी महसूल मिळत आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुळे झालेल्या ३ लाख ८५ हजार मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची भरपाई करणे आर्थिकदृष्ट्या अवघड आहे. जर राज्यांना हे करण्यास भाग पाडले गेले तर आपत्ती व्यवस्थापनाच्या इतर आवश्यक कामांवर परिणाम होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com