”वेगाने लसीकरण केलं नाही तर, महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येईल”

”वेगाने लसीकरण केलं नाही तर, महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येईल”

Published by :
Published on

महाराष्ट्र सरकारने पुरेश्या प्रमाणामध्ये लसी उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वर्षांमधील व्यक्तींचं लसीकरण एक मे पासून सुरु न करता पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केल्यानंतर ही माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

यातच महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांनी बुधावारी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात इशारा दिला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वी अनेकदा पुरेश्या प्रमाणात लसी उपलब्ध नसल्याबद्दल चिंता व्यक्त केलीय. राज्याच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात दीड कोटी लोकांचे लसीकरण झालं आहे. "महाराष्ट्रात लस घेण्यासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींची संख्या नऊ कोटी इतकी आहे मात्र लसीकरण केवळ दीड कोटी लोकांचं झालं आहे. ही संख्या खूप कमी आहे," असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. पुढे बोलताना या अधिकाऱ्याने महाराष्ट्रातील तिसऱ्या लाटेसंदर्भातील भीती व्यक्त केलीय. "आपण वेगाने लसीकरण केलं नाही तर लोक नोकऱ्या आणि इतर कामांसाठी आता घराबाहेर पडू लागतील आणि त्यामधून कोरोनाची तिसरी लाट येईल," असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com