Covid-19 updates
लहान मुलाला कोरोना होऊन गेला असेल तर २ आठवडे काळजी घ्या
कोरोनातून बरे होणाऱ्या लहान मुलांमध्ये एका नव्या आजाराची लक्षणे आढळत आहे. यावर नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी सविस्तर माहिती दिली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या लहान मुलांमध्ये काही नवीन लक्षणे आढळत आहे. तसेच बऱ्याच कोरोनामुक्त लहान मुलांना २ ते ६ आठवड्यांच्या कालावधीत ताप, त्वचेवर खाज येणे, डोळे लाल होणे, जुलाब, उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसून आली.
तसेच अशा बाधित मुलांना कोरोनाचा संसर्ग आढळून आला नाही, परंतु त्यांच्या आढळलेली ही लक्षणे अगदी करोनाप्रमाणेच आहेत. अशा लक्षणांना Multi System Inflammatory Syndrome असे म्हटले जाते . त्यामुळे करोनामुक्त होणाऱ्या लहान मुलांची २ ते ६ आठवडे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.