गणपतीच्या उंचीमुळे कोरोना कसा वाढतो? माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल

गणपतीच्या उंचीमुळे कोरोना कसा वाढतो? माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल

Published by :
Published on

कोरोना पाश्वभुमीवर महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सण असलेला गणेशोत्सवावर राज्य सरकारने गेल्या वर्षी प्रमाणेच काही निर्बंध घातले आहे. गणेश मुर्त्यांची उंची हि साधारण ४ फुटांपर्यंत असावी असे राज्य सरकार कडून सांगण्यात आले. या निर्णयांवर गणेश भक्त नाराज असून गणपतीची उंची ठरवण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला असा सवाल भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी आपला मुखपत्र असलेल्या प्रहार वृत्तपत्राला दिलेल्या मुलाकतीत बोलले.

भाजप नेते नारायण राणे म्हणाले की, "गणपतीच्या मूर्तीची उंची चार फूट असावी की दोन फूट, हे सरकारने का ठरवावे? गणेशमूर्तीची उंची वाढली, तर कोरोना कसा वाढू शकतो, हे मुख्यमंत्र्यांनी जनतेला स्पष्ट करून सांगावे. कोरोनाची भीती पसरवून ठाकरे सरकारने अगोदरच लॉकडाऊन जनतेच्या माथी मारला आहे. त्यात पुन्हा गणेशोत्सवावर निर्बंध घालून जनसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आणि वैभव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती गणपती यांच्या मूर्तींच्या उंचीवर निर्बंध लादणारा निर्णय १३ कोटी मराठी जनतेच्या श्रद्धेवर घाव घालणारा आहे", अशी टीका माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

नारायण राणे यांनी केलेल्या टिकेनंतर शिवसेना या टिकेला काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com