Shree Krishna Janmashtami : कृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त, आणि पूजा पद्धत जाणून घ्या
श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे.
भाद्रपदाची अष्टमी तिथी बुधवार, 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजून 37 मिनिटांनी सुरू होत आहे. अष्टमी तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी गुरुवार, 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजून 14 मिनिटांनी समाप्त होईल. असे वैदिक दिनदर्शिकेनुसार आहे.
जन्माष्टमी तिथी : बुधवार, 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 03:37 वाजता सुरू होईल
जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त : 12:02 ते दुपारी 12:48 पर्यंत असेल.
जन्माष्टमी व्रत असते. व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करावेत. जन्माष्टमीला दिवसभर भगवान श्रीकृष्णाचे कीर्तन केले जाते. श्रीकृष्णाचे पूजन केलं जाते. देवाला खव्याचा नैवेद्य दाखवला जातो. हे व्रत रात्री 12 वाजल्यानंतरच सोडले जाते. जन्माष्टमीच्या व्रताची सुरुवात अष्टमीच्या उपवासाने सुरू होते. या दिवशी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. रात्री १२.४३ नंतर जन्मोत्सवानंतर व्रत पूर्ण होते. जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहीहंडी साजरी केली जाते. यंदाचा दहीहंडी सोहळा गुरुवार,७ सप्टेंबर रोजी होणार आहे.भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने संतती सुख मिळते. यासोबतच घरात समृद्धी राहते. असे म्हटले जाते.