मल्ल्या, नीरव आणि चोक्सीला दणका; ९ हजार कोटींची संपत्ती बँकांच्या ताब्यात

मल्ल्या, नीरव आणि चोक्सीला दणका; ९ हजार कोटींची संपत्ती बँकांच्या ताब्यात

Published by :
Published on

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला दणका! ९ हजार कोटींची संपत्ती बँकांकडे हस्तांतरित
बँकांना गंडा घालून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना ईडीने आणखी एक दणका दिला आहे.

बँकांना गंडा घालून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मोठा झटका दिला आहे. तिन्ही उद्योगपतींनी सार्वजनिक बँकांचं कर्ज बूडवून परदेशात पोबारा केला आहे. या प्रकरणात ईडीने नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहुल चौक्सी यांची १८ हजार १७० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. यापैकी ९ हजार कोटींची संपत्ती ईडीने कर्ज बुडवण्यात आलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com