Hijab | ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यानंतर ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा देणारी ती तरुणी आहे तरी कोण?
कर्नाटकमध्ये सध्या हिजाब प्रकरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने काढण्यात आली असून त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटलेले पाहायला मिळत आहेत.
शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये भगवी शाल आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्याने तणाव वाढला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, मुलांचा एक गट हिजाब परिधान केलेल्या मुलींसोबत गैरवर्तन करताना दिसत होता. या व्हिडिओमध्ये मुस्कान नावाची तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यास सुरुवात करतात. यानंतर तरुणीदेखील त्यांना उत्तर देत 'अल्लाहू अकबर' ची घोषणा देते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
त्या तरुणीने तिच्याबदद्ल काय सांगितले?
एका माध्यमाशी बोलताना त्या तरुणीने (मुस्कानने) सांगितले की, आपण कॉलेजमध्ये एका असाईनमेंटसाठी गेलो होतो. ते लोक आपल्याला कॉलेजमध्ये जाऊ देत नव्हते. बुरखा हटवल्यानंतरच आत जायचं असं ते सांगत होते. जेव्हा मी गेले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. या जमावामध्ये काही कॉलेजमधील लोक तर काही बाहेरचे लोकं होते. जेव्हा त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या तेव्हा मी अल्लाहू अकबरची घोषणा दिली. बुरखा हटवला नाही तर आम्हीदेखील भगवा कपडा हटवणार नाही अशी धमकी ते देत होते
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हा हिजाबचा वाद सुरु आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा आदेश महाविद्यालयात देण्यात आला आहे. या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत. त्यामुळे हा वाद आणखीणच चिघळला.
या पार्श्वभूमीवर ओवैसींनी ट्विट करत म्हटले आहे की, तरुणींचं कौतुक केलं आहे. येथील मुस्लिम तरुणींनी हिंदुत्ववादी जमाविरोधात धाडस दाखवल्याचं ते म्हणाले आहेत. तरुणींना आपल्या संविधानिक अधिकारांचा योग्य वापर केला आहे शिवाय हे म्हणत असताना त्यांनी मोदींवर देखिल निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दोन वेळा बोलले पण एकदाही कर्नाटकमधील घटनेवर भाष्य केलं आहे. त्यांचं मौन नेमकं काय सांगतं? हेच 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' आहे का?
कॉलेजमध्ये दगडफेकीच्या घटनांमुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, सरकार आणि उच्च न्यायालयाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.