हिंगोलीच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात
आज ४ ऑक्टोबर राज्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे.
हिंगोली जिल्ह्यात हवामान खात्याने 3 ऑक्टोंबर ते 5 ऑक्टोंबरदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा हिंगोलीतील काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा एकदा पाऊस पडत असल्याने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास 06 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारताच्या काही भागांतून सुरु होईल.