This cancer spreading in Men's: पुरूषांमध्ये शांतपणे पसरतोय "हा" कॅन्सर; जाणून घ्या लक्षणे...

This cancer spreading in Men's: पुरूषांमध्ये शांतपणे पसरतोय "हा" कॅन्सर; जाणून घ्या लक्षणे...

लीकडच्या काळात पुरुषांमध्ये एका कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याकडे वेळेवर लक्ष दिलं नाही याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
Published by :
Team Lokshahi
Published on

कर्करोग हा सध्या संपूर्ण जगासाठी एक अशी समस्या आहे, ज्यापासून मुक्त होणं खूप कठीण आहे. यासाठी वेळेवर उपचार करून त्याचा धोका कमी केला जाऊ शकतो, परंतु याचा प्रतिबंध करणे सोपे नाही. अलीकडच्या काळात पुरुषांमध्ये एका कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याकडे वेळेवर लक्ष दिलं नाही याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार प्रोस्टेट कर्करोगाचा धोका पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा एक मूक कर्करोग आहे, जो शरीरात शांतपणे वाढतो आणि यामुळेच या कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला समजणे कठीण जाते आणि हळूहळू इतर अवयवांमध्येही हा कॅन्सर पसरतो. पुरुषांमधील प्रोस्टेट कर्करोगावर एका ब्रिटीश टीमने एक अभ्यास केला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की प्रत्येक 2 पैकी 1 पुरुषाला त्याच्या आयुष्यात कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. त्याचवेळी 3 पैकी 1 महिलांना कर्करोगाचा धोका असतो.

या प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे काय आहेत? तर...

अशक्तपणा किंवा थकवा - पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकवा येणे, अशक्त होणे किंवा भूक न लागणे चांगले नाही.

लघवीमध्ये बदल- लघवीला त्रास होणे, लघवीचा प्रवाह कमी होणे किंवा वारंवार लघवी होणे तसेच लघवीत रक्त येणे हे एक सामान्य लक्षण आहे.

पोटदुखी आणि अपचन - तळलेले अन्न खाल्ल्यानंतर पोट दुखणे सामान्य आहे, परंतु पोटाच्या वरच्या भागात वेदना जाणवणे नेहमीच सामान्य नसते. यासोबतच जास्त अन्न खाणे हे देखील पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. याशिवाय वारंवार वजन कमी होणे आणि न कळणारा खोकला हे देखील पुरुषांमध्ये कर्करोगाचे लक्षण आहे.

वेदना किंवा जळजळ - लघवी करताना रशांना वेदना किंवा जळजळ जाणवू शकते.

पाठदुखी - जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय पाठीत असामान्य वेदना होत असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे, कारण हे दुखणे सूचित करते की कर्करोग हाडांमध्ये पसरू लागला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com