भाजलेले चणे आहे आरोग्यासाठी वरदान; होतात 'हे' फायदे

भाजलेले चणे आहे आरोग्यासाठी वरदान; होतात 'हे' फायदे

भाजलेले चणे शरीरासाठी रामबाण औषध मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोज भाजलेले चणे खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होतेच पण हृदयाचे आरोग्यही सुधारते.
Published on

Roasted Chana Benefits : भाजलेले चणे शरीरासाठी रामबाण औषध मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोज भाजलेले चणे खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होतेच पण हृदयाचे आरोग्यही सुधारते. प्रथिने, फायबर, मॅंगनीज, फोलेट, फॉस्फरस, तांबे, फॅटी अ‍ॅसिडस्, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्त्वे भाजलेल्या हरभऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक समस्यांपासून आराम मिळतो आणि अनेक फायदे होतात.

भाजलेले चणे आहे आरोग्यासाठी वरदान; होतात 'हे' फायदे
रोज भाजीत वापरा तमालपत्र; होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

भाजलेले चणे खाण्याचे फायदे

बद्धकोष्ठतेपासून आराम

पोटाच्या बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर भाजलेले चणे खा. भाजलेले चणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. तज्ज्ञ देखील आहारात समाविष्ट करण्याची शिफारस करतात.

हृदय निरोगी ठेवते

भाजलेले चणे हा हृदयाचा साथीदार मानला जातो. याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. भाजलेल्या चण्यामध्ये मुबलक प्रमाणात मॅंगनीज, फॉस्फरस, फोलेट आणि तांबे असतात, जे चांगले रक्ताभिसरण राखण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

रक्तदाब नियंत्रित करा

चण्यामध्ये फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि प्रथिने आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात. भाजलेल्या चण्याध्ये तांबे, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम आढळतात. ज्यामुळे सूज कमी होते आणि रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. मॅंगनीज ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्याचे काम करते. भाजलेले चणेदेखील फॉस्फरसचे स्त्रोत आहे, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

मधुमेहामध्ये फायदेशीर

जर एखाद्याला मधुमेह असेल तर त्याच्यासाठी भाजलेले चणे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. तज्ज्ञांच्या मते, भाजलेल्या हरभऱ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर मानले जाते.

वजन कमी करण्यास मदत

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आजपासूनच आहारात भाजलेल्या चण्याचा समावेश करा. हे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे पुन्हा पुन्हा खाणे टाळण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्ती मजबूत राहते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com