भाजलेला मखाना आवडतो, एकदा तूपात भाजलेला मखाना खा आणि पाहा 'हे' आरोग्यदायी फायदे...
मखाना हे एक आनंददायक कुरकुरीत आणि लोणीयुक्त पदार्थ आहे. मखनामध्ये अनेक पौष्टिक आणि आरोग्याला फायदेशीर असे गुणधर्म आढळतात. मखनामध्ये कॅलरीज आणि प्रोटिन्सचा समावेश असतो तसेच मखाना हे लोकॉलेस्ट्रॉन असते. ज्यामुळे अनेक लोक मखाना भाजून खाण्यास जास्त पसंत करतात. असेच भाजलेले मखाना खाण्यापेक्षा मखाना तूपात भाजून खाण्याचे अनेक फायदे आहेत.
तूपाचे फायदे हे आपल्या प्रत्येकाला माहित आहेत. तूप देखील जिवनसत्तव, आर्यन, कॅल्शियम आणि अनेक पौष्टिक गुणधर्मानी भरपूर असते. तूप मखनाबरोबर एकत्रित केल्यावर ते रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून मुक्त करते. तुपात भाजलेले मखना खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहण्यास मदत होते आणि मखानामध्ये सोडियमचे प्रमाण कमी होते, तुप पचनास मदत करते.
तूपात मखाना भाजल्याने मखानाचे पौष्टिक मूल्य वाढवते आणि संतुलित राहते. तूपात मखाना भाजल्याने लोणीयुक्त चव मखानाला येते. ज्यामुळे तूपात मखाना भाजल्याने एक पौष्टिक नाश्ता मिळतो.