Night-Flowering Jasmine: जाणून घ्या 'या' वनस्पतीची औषधी फायदे

Night-Flowering Jasmine: जाणून घ्या 'या' वनस्पतीची औषधी फायदे

पारिजातकाची फुलं सगळ्यांना माहिती असतात. पावसाळ्यात तर सकाळी झाडाखाली अक्षरशः फुलांचा सडा पडलेला असतो.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

आज आपण पारिजातक या वनस्पतीची माहिती करून घेणार आहोत. पारिजातकाची फुलं सगळ्यांना माहिती असतात. पावसाळ्यात तर सकाळी झाडाखाली अक्षरशः फुलांचा सडा पडलेला असतो. असं म्हणतात की, पहिलं पारिजातकाचं झाड प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी स्वर्गातून पृथ्वीवर आणलं. अशा स्वर्गीय झाडाचे औषधी उपयोग असणारच. पारिजातकाची पानं थोडी राठ आणि सॅन्ड पेपरची आठवण करून देणारी असतात. पण याचे औषधी उपयोग अनेक असतात.

पहिला महत्त्वाचा उपयोग म्हणजे ही पानं ताप कमी करणारी असतात. विशेषतः ज्या तापात अंग खूप दुखतं, त्यावर हा उपाय करून पाहावा. पारिजातकाची ताजी पानं आणून ती ठेचावी. त्याचा कल्क तयार करावा. आता यातच पाव चमचा गुळ मिसळून तयार केलेलं मिश्रण सकाळ-संध्याकाळ घ्यावं. यामुळे ताप आणि अंगदुखी कमी होते.

Night-Flowering Jasmine: जाणून घ्या 'या' वनस्पतीची औषधी फायदे
Rugular Periods Home Remedy: नियमित मासिक पाळीसाठी करा घरच्याघरी 'हे' उपाय

अगदी चिकन गुनिया, डेंग्यू सारख्या तापातही याचा उपयोग होताना दिसतो आणि यामुळे रक्तातील प्लेटलेट्स कमी होत नाहीत असंही आधुनिक संशोधनमध्ये आढळून आलेलं आहे. पारिजातकाची पानं त्वचेवरचे बुरशीजन्य संसर्गही कमी करणारी असतात. त्यामुळे दादच्या गोलाकार पॅचवर या पानांचा रस चोळून लावला तर खाज कमी होते आणि हळूहळू पॅचेसही कमी होतात. सध्या पारिजातकाची झाडं फुलांनी बहरलेली आहेत. त्यामुळे घराच्या आसपास पारिजात कुठे आहे हे बघून ठेवलं, तर ऐनवेळी त्याच्या पानांचा असा उपयोग करून घेता येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com