मासिक पाळी, अशक्तपणा तसेच रक्ताची कमतरता या सर्व समस्या दूर करेल अळीव: जाणून घ्या अळीवचे आरोग्यदायी फायदे...

मासिक पाळी, अशक्तपणा तसेच रक्ताची कमतरता या सर्व समस्या दूर करेल अळीव: जाणून घ्या अळीवचे आरोग्यदायी फायदे...

अळीवाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्त्वे आढळतात, ज्यामध्ये फायबर, मिनरल्स, व्हिटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स यांचा समावेश होतो. त्यामुळे अळीवाच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
Published by :
Team Lokshahi
Published on

अळीवाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्त्वे आढळतात, ज्यामध्ये फायबर, मिनरल्स, व्हिटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स यांचा समावेश होतो. त्यामुळे अळीवाच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अळीवच्या बिया आकाराने लहान आणि लाल रंगाच्या असतात. हृदय रोग असणाऱ्या व्यक्तीने अळीवाच्या बियांचे सेवन करावे त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. अळीव रक्ताची कमतरता दूर करते तसेच अॅनिमियाचा त्रास दूर करण्यास मदत करते.

तर महिलांमध्ये रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे गरोदर महिलांना डिलीव्हरीनंतर अळीवाचे लाडू खाण्यासाठी दिले जातात. अळीवाच्या बियांमध्ये १२ मिलीग्रॅम आर्यन असतात. अळीवाच्या बियांना 'गार्डन क्रेस सीड' किंवा 'हलिवा सीड' असे सुद्धा म्हटले जाते. अळीवाच्या बियांमध्ये लोह, फायबर, प्रथिने, तसेच सी, ए आणि ई असे जीवनसत्त्वे या पोषक तत्त्वांचा समावेश असतो. जे अनेक आरोग्याच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.

मासिक पाळी नियंत्रण आणि शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते:

गर्भधारणेसाठी मासिक पाळी ही वेळच्यावेळी येणे फार गरजेचे असते. त्यासाठी शरीरात रक्ताची कमतरता असणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येते. यामुळे त्यांची मासिक पाळी वेळेवर येत नाही. अशा वेळेस महिलांनी दिवसातून एकदा अळीवाच्या बियांचे सेवन केले पाहिजे. यात फायटोकेमिकल्स, उच्च प्रमाणात लोह यांचा समावेश असतो. जे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करतात.

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते:

अळीवाच्या बियांमध्ये बी-कॉम्प्लेक्स, व्हिटॅमीन आणि पोषकतत्त्वे आहेत. यामध्ये असणारे पोषकतत्त्वे केसांतील डैंड्रफची समस्या दूर करून केसांची वाढ होऊन केस लांबसडक, मजबूत आणि जाड होण्यास मदत करतात. तसेच अळीवाच्या बियांमध्ये ओमेगा-3 फैटी एसिड हे आढळते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करून त्वचा चमकदार करण्यास मदत करते.

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम देतो:

अळीवाच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाणात जास्त असते. ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅस तसेच ब्लोटिंग या समस्यांपासून सुटका देतो. यामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि पोट साफ राहण्यास मदत होते. अळीवाची खीर किंवा लाडू या पदार्थांचे सेवन करून आरोग्यावर नियंत्रण ठेवता येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com