डोळ्याची वरची पापणी लाल होऊन सुजते? जाणून घ्या यामगचं नेमक कारण...

डोळ्याची वरची पापणी लाल होऊन सुजते? जाणून घ्या यामगचं नेमक कारण...

डोळे हा आपल्या शरीरातील नाजूक महत्तवाचा अवयव आहे. डोळ्यांची काळजी ही जपून घ्यावी लागते. डोळ्यांच्या प्रत्येक समस्येकडे लक्ष देणे आवशअयक आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

डोळे हा आपल्या शरीरातील नाजूक आणि महत्तवाचा अवयव आहे. डोळ्यांची काळजी ही जपून घ्यावी लागते. डोळ्यांच्या प्रत्येक समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. धूळ, कचरा, किंवा एखादा लहानसा किटक डोळ्यात गेला की आपण डोळे चोळू लागतो आणि त्यामुळे डोळे लाल होतात आणि थोड्या वेळाने डोळ्याच्या वरच्या पापणीला सुज येते. ज्यामुळे डोळा चुरचुरतो, खाज येते आणि डोळ्यात जळण देखील होऊ लागते. डोळ्यांसंबंधीत एखादी समस्या उद्धवल्यास तातडीने त्याच्यावर योग्य तो उपचार करून घ्यावा. ज्यामुळे कोणतीही मोठी हानि होणार नाही.

ज्यावेळेस डोळ्यात काही गेलं आहे असं वाटू लागल्यास ओल्या कपड्याने डोळा पुसून घ्यावा आणि 15 ते 20 मिनिटासाठी डोळ्यावर ओला कपडा ठेवावा. असं केल्याने डोळ्यांच्या ग्रथींमध्ये साचलेले तेल निघून जाण्यास मदत होते.

डोळे चुरचुरु लागल्यास कधीच डोळे चोळू नका असं केल्याने डोळ्यात गेलेली धूळ ही डोळ्याच्या इतर भागात पसरते. ज्यामुळे आणखी इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशा वेळेस रुमाल किंवा एखाद्या कपड्याने डोळा स्वच्छ करावा. हलक्या हातानी डोळा साफ करून घ्यावा.

मोबाईल, लॅपटॉप आणि टिव्ही यांचा वापर कमी प्रमाणात करा. यांच्यामधून येणाऱ्या ब्ल्यू लाईटमुळे डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता असते. यामुळे देखील डोळ्यांना सुज येते आणि डोळे लाल होतोत. तसेच पुरेशी झोप घेणे ही गरजेचे आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com