बाजारातून न आणता घरीच तयार करा बदामाचे दूध; 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

बाजारातून न आणता घरीच तयार करा बदामाचे दूध; 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

काही लोकांना दुग्धजन्य पदार्थ आवडत नाहीत आणि म्हणूनच दुधाचे अनेक पर्याय आज आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी एक बदामाचे दूध आहे.
Published on

Almond Milk Recipe : काही लोकांना दुग्धजन्य पदार्थ आवडत नाहीत आणि म्हणूनच दुधाचे अनेक पर्याय आज आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी एक बदामाचे दूध आहे. बदामाच्या दुधाचे पौष्टिक मूल्य खूप चांगले असते. यामुळे तुमची हाडे मजबूत होतात आणि त्यासोबतच त्यात कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. तुम्ही बाजारातून बदामाचे दूधही विकत घेत असाल, पण त्यात भेसळ होण्याची भीती जास्त असते. जर तुम्हाला तुमच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही घरीच बदामाचे दूध काढू शकता. आम्ही तुम्हाला बदामापासून दूध बनवण्याचा सोपा मार्ग सांगणार आहोत.

बाजारातून न आणता घरीच तयार करा बदामाचे दूध; 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो
टेस्टी आणि हेल्दी अक्रोड केळीची खीर; जाणून घ्या रेसिपी

साहित्य

बदामाचे दूध बनवताना १ कप बदाम ते २ कप पाणी या गुणोत्तराने घ्या. जर तुम्हाला पातळ दूध हवे असेल तर जास्त पाणी वापरा. घट्ट दूध मिळवण्यासाठी बदामाचे प्रमाण जास्त आणि पाण्याचे प्रमाण थोडे कमी ठेवावे.

बदामाचे दूध बनवण्याची कृती

बदाम रात्रभर किंवा २ दिवस भिजत ठेवा. बदाम फुगतात कारण ते पाणी शोषून घेतात. लक्षात ठेवा की तुम्ही बदाम जेवढा जास्त काळ भिजवाल तेवढे बदामाचे दूध जास्त मलईदार होईल. यानंतर बदाम धुवून चांगले गाळून घ्या म्हणजे पाणी निघून जाईल. आता फूड प्रोसेसरमध्ये 2 कप पाण्यात बदाम मिसळा. आणि 2 मिनिटे हाय स्पीडवर ब्लेंडरमधून काढा.बदाम चांगले क्रश झाले पाहिजे हे लक्षात ठेवा.

यानंतर, प्रथम गाळणीतून गाळून घ्या. यानंतर एका भांड्यावर चाळणी ठेवा आणि त्यावर स्वच्छ कापड ठेवा. त्यात बदामाचे मिश्रण टाका आणि थोडा वेळ राहू द्या. यानंतर, हे कापड पिळून घ्या आणि तुमचे मलईदार बदामाचे दूध तयार झाले आहे. उरलेले बदामाची पेस्ट तुम्ही जेवण, कुकीज, ओटमील, डेजर्ट इत्यादी बनवण्यासाठी सहज वापरू शकता.

ताजे बदाम दूध कसे साठवायचे?

घरगुती बदामाचे दूध रेफ्रिजरेटरमध्ये फक्त काही दिवस साठवले जाऊ शकते. त्यामुळे आवश्यक तेवढेच बनवा. त्याचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी ते पाश्चराइज्ड केले जाऊ शकते. ते उकळवून काचेच्या डब्यात साठवा. रेफ्रिजरेटरच्या बाहेर दूध साठवताना लक्षात ठेवा की ते गरम ठिकाणी ठेवू नका, अन्यथा ते लवकर खराब होऊ शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com