Green Tea: सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे किती फायदेशीर? जाणून घ्या...
ग्रीन टी हे हेल्दी ड्रिंक आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. तसेच शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. पण जेव्हा तुम्ही ते चुकीच्या वेळी प्याल तर ते हानिकारक ठरू शकते. काही लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी रिकाम्या पोटी ते पिणे फायदेशीर आहे, परंतु तसे नाही. चला तर मग जाणून घेउया ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे.
रिकाम्या पोटी ग्रीन टी खरोखरच फायदेशीर आहे का?
आरोग्यासाठी ग्रीन टीचे अनेक फायदे आहेत. पण सकाळी रिकाम्या पोटी पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने तुमच्या पोटाचे संतुलन बिघडू शकते.
याचे कारण असे की त्यात अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपुर असते. त्यासोबतच त्यात पॉलीफेनॉल असतात. जे पोटात अॅसिड तयार करण्यास मदत करतात. ज्यामुळे पोटात पचनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे पोटात जडपणा किंवा गॅस होऊ शकतो.
बद्धकोष्ठता असू शकते.
रिकाम्या पोटी ग्रीन टी पिण्याचे अनेक वाईट परिणाम होतात. त्यात टॅनिनची चांगली मात्रा असते ज्यामुळे आम्ल वाढू शकते. त्यामुळे मळमळ होऊ शकते. पोटातील अतिरिक्त ऍसिड नंतर बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.
ते पिण्याची योग्य पद्धत कोणती?
जर तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायची असेल तर तुम्हाला तुमची पद्धत बदलावी लागेल. जसे ग्रीन टी सोबत काही बिस्किटे किंवा स्नॅक्स घ्यावे. यासह जेवणा दरम्यान किंवा खाण्यापूर्वी पिणे चांगले आहे.
किती वेळा प्यावे
तज्ञांच्या मते, जर तुम्ही दिवसभरात एक किंवा दोन कप ग्रीन टी पीत असाल तर हे योग्य प्रमाण आहे. ते जास्त पिणे टाळा. असे केल्याने यकृत खराब होण्याची तक्रार असू शकते.
जेवल्यानंतर लगेच पिणे योग्य आहे का?
काही लोक जेवल्यानंतर लगेच ग्रीन टी पितात, कारण त्यांना असे वाटते की असे केल्याने त्यांचे वजन कमी होईल. तसे नसले तरी रिपोर्ट्सनुसार, हे खाल्ल्यानंतर लगेच प्यायल्याने गॅस्ट्रिक ज्यूस वाढू शकतो, ज्यामुळे अॅसिडिटी आणि पोटात जडपणा सारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच नेहमी खाल्ल्यानंतर ग्रीन टी अर्ध्या तासानंतरच प्यावे.