शरद ऋतूत मायग्रेनचा त्रास: पित्त कमी करण्याचे घरगुती उपाय

शरद ऋतूत मायग्रेनचा त्रास: पित्त कमी करण्याचे घरगुती उपाय

पावसाळ्यानंतर मायग्रेनचा त्रास? जाणून घ्या पित्तशामक आहार, तूप लावून पादाभ्यंग, आणि औषधांनी कसा मिळवावा आराम
Published by :
shweta walge
Published on

श्री रवींद्र यांचा एक प्रश्न आला आहे. ते म्हणतायंत, पावसाळा संपत आला की दरवर्षी एक दोन महिने मला migraineचा त्रास होतो. डॉक्टरांनी दिलेली गोळी घेतल्याशिवाय अजिबात बरं वाटत नाही. नंतर वर्षभर क्वचित जागरणं खूप झाली किंवा खूप बाहेरचं खावं लागलं तरच त्रास होतो. पण पावसाळा संपून हिवाळा सुरू होतो त्या दिवसात खूपच डोकं दुखतं. कृपया काही उपाय सुचवावा.

रवींद्रजी, तुम्हाला होणारा migraine चा त्रास हा शरद ऋतूत प्रकुपित होणाऱ्या पित्ताशी संबंधित आहे. त्यामुळे पित्त म्हणजेच उष्णता कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या दृष्टीनी नियमित पादाभ्यंग करण्याचा, म्हणजे तळपायांना चांगलं तूप लावून, शुद्ध कशाच्या वाटीनीपाय दहा दहा मिनिटांसाठी चोळण्याचा तुम्हाला उपयोग होईल.

याशिवाय कामदुधा आणि प्रवाळ पंचामृत या गोळ्या सकाळ संध्याकाळ घेण्याचाही उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा अविपत्तीकर चूर्ण घेण्यानीही शरीरात साठलेलं पित्त दुसऱ्या दिवशी सकाळी शौचावाटे निघून गेलं, की असा त्रास वारंवार होणार नाही. याशिवाय पावसाळ्यापासूनच आहारात साळीच्या लाह्या, मूग, घरी बनवलेलं साजूक तूप, ज्वारी, दुधी, कोहळा, पडवळ, परवर अशा पित्तशामक भाज्यांचा समावेश करण्याची सुरुवात केली, तर पित्तदोष आटोक्यात राहील आणि migraineचा त्रास टाळता येईल.

रविंद्रजी या उपायांचा फायदा होईलच, पण प्रकृतीनुसार योग्य आणि नेमकी औषधं घेण्यासाठी, एकदा प्रत्यक्ष consultation घेणंहे कधीही चांगलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com