प्रदूषणात ‘हे’ पाणी प्यायल्याने होईल फायदा, जाणून घ्या
Jaggery Water : दिल्ली आणि मुंबईत वायू प्रदूषणाने कहर केला आहे. प्रदूषणामुळे AIQ पातळी इतकी खालावली आहे की लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांपासून ते आरोग्यतज्ज्ञांपर्यंत कमीत कमी घराबाहेर पडण्याचा सल्ला देत आहेत. अशात, तुम्हाला इम्युनिटी वाढवण्यासाठी खास टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या स्वास्थ्याशी संबंधित प्रॉब्लेम दूर होतील. गुळाच्या अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे पोटॅशियम भरपूर असल्याने ते शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते. हे अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास खूप मदत करते. यासोबतच गूळ तुमच्या स्नायूंनाही पोषण देतो. चला तर मग जाणून घेऊया गुळाच्या पाण्याचे फायदे
शरीर साफ करते
गुळामध्ये शरीर शुद्ध होण्यास मदत करणारे गुणधर्म असतात. हे नैसर्गिकरित्या शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करते, रक्त शुद्ध करते, यकृत शुद्ध करते. जर तुम्ही नियमितपणे कोमट पाण्यात मर्यादित प्रमाणात गुळाचे सेवन केले तर तुमचे शरीर प्रभावीपणे निरोगी राहते, रोगांपासून मुक्त होते, कारण शरीरातून हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकले जातील.
चयापचय आणि रोग प्रतिकारशक्ती सुधारते
गूळ मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 1, बी 6, सीचा उत्कृष्ट स्त्रोत आहे आणि झिंक, सेलेनियम यांसारख्या अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांनी समृद्ध आहे. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी गुळासोबत पाणी प्यायल्यास तुमची चयापचय क्रिया सुधारते आणि प्रतिकारशक्तीही वाढते.
अॅनिमियावर उपचार करते
जर तुमचे हिमोग्लोबिन कमी असेल तर प्राचीन काळापासून गूळ खाण्याचा सल्ला दिला जात होता. त्यात भरपूर लोह आणि फोलेट असते ज्यामुळे शरीरातील RBC ची संख्या चांगली राहते. गरोदर स्त्रिया असोत किंवा अशक्त लोक असोत गरम पाण्यात गूळ मिसळून प्यायल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. जर एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्याने प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतरच गुळाचे पाणी प्यावे.