नाश्ता, जेवणाची योग्य वेळ कोणती माहित आहे का? जाणून घ्या

नाश्ता, जेवणाची योग्य वेळ कोणती माहित आहे का? जाणून घ्या

काय जेवावं आणि कधी जेवावं हे ज्याला कळतं आणि त्याप्रमाणे जो वागतो तो मनुष्य निरोगी राहतो.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

काय जेवावं आणि कधी जेवावं हे ज्याला कळतं आणि त्याप्रमाणे जो वागतो तो मनुष्य निरोगी राहतो. एक म्हणजे आधीचं अन्न पचल्याशिवाय जेवू नये म्हणजेच तीन ते चार तासांच्या आत पुन्हा जेवू नये. तसेच सूर्य आकाशात जेव्हा प्रखर असतो त्या वेळेला जेवावं.

सकाळचा नाश्ता कधी करावा?

जर एकदा खाल्ल्यानंतर तीन ते चार तास पुन्हा काही खायचं नसेल तर नाश्ता साडेआठ ते नऊच्या दरम्यान करणं महत्वाचे आहे. नाश्ता जर दहा साडेदहाला केला तर दुपारच्या जेवणाची वेळ नक्कीच चुकणार नाही.

दुपारचं जेवण कधी करावं?

दुपारी बारा वाजता सूर्य सर्वाधिक प्रखर असतो. त्यामुळे दुपारचं जेवण बारा - साडेबाराच्या दरम्यान जेवण करावं.

रात्रीचं जेवण कधी करावं?

सूर्यास्ताची वेळ सर्वसाधारणपणे सात धरली तर त्यानुसार फार तर फार एक तासाच्या आत म्हणजे आठच्या आसपास रात्रीचं जेवण उरकून घ्यावं. वेळेवर जेवलं की अग्नी प्रदीप्त राहतो, अन्नपचन व्यवस्थित होतं, बल, वर्ण, प्रतिकारशक्ती वाढते.

त्यामुळे सकाळी नाष्ता करायचा असेल तर तो साडेआठ ते नऊच्या दरम्यान, दुपारचं जेवण बारा, साडेबारा दरम्यान आणि संध्याकाळचं जेवण साडेसातच्या आसपास करण्याचा प्रयत्न करा. आरोग्य निरोगी राहते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com