पाइल्समुळे होणारा त्रास हा खूप भयंकर असतो. मूळव्याधा मध्ये रक्तस्त्राव होण्याचा अर्थ आहे मलाशय आणि गुद्द्वार मध्ये काहीतरी गंभीर समस्या आहे. पाइल्स हा एक सामान्य आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. बद्धकोष्ठतेमुळे होणारा आजार आहे. या आजारात शौचास साफ होऊ शकत नाही त्यामुळे गुदाशय आणि गुदद्वाराच्या भागाच्या नसा फुगतात आणि गाठी तयार होतात.
मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात. पहिला अंतर्गत मूळव्याध जो गुदाशयाच्या आतमध्ये विकसित होतो आणि दुसरा बाह्य मूळव्याध जो बाहेर म्हणजे गुदाशयाच्या भोवतीच्या त्वचेखाली विकसित होतो. मूळव्याध होऊ नये यासाठी फायबरयुक्त आहाराचे नियमित सेवन करावे. यामुळे आतड्यांसंबंधीचा ताण कमी होतो. आहारात भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि शेंगा यांचा समावेश करावा.
रात्री अति जागरण करू नये. दीर्घकाळ बसणे किंवा उभे राहणे टाळावे. भाज्या आणि ताजी फळे. हे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात. तुम्ही नियमित व्यायाम करणे, धावणे आणि इतर शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत.अधिक प्रमाणात जंक फूड, तेलकट आणि तिखट पदार्थ खाणे टाळावे.
येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. लोकशाही मराठी न्यूज याची पुष्टी करत नाही.