Health: हिवाळ्यामध्ये त्वचा आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी दक्षता जोइलचे घरगुती उपाय
जसजसा हिवाळा ऋतू उलगडत जातो, तसतसे त्वचा आणि केस कोरडे पडत जातात. सेलिब्रिटी असो किंवा साधारण माणूस आपल्या त्वचेची काळजी घरगुती गोष्टींचा वापर करून करणे ह्याला जास्त प्राध्यान दिले जाते. हे घरगुती उपाय जर तुमचा आवडता कलाकार देत असेल त्याच्या स्वतःच्या स्किन आणि हेअरकेर नित्यक्रमातुन तर त्याची गोष्टचं वेगळी आहे. 'सारं काही तिच्यासाठीची' निशिगंधा खोत म्हणजेच दक्षता जोइल आपल्या निरोगी लांबलचक केस आणि स्वच्छ चमकदार त्वचेचे रहस्य आज सर्वांसमोर उलघडणार आहे.
दक्षताने रहस्य उलघडताना सांगितले, “मी आठवड्याततुन एकदा रात्री पाण्याची वाफ घेते. रात्री यासाठी कारण वाफ घेतली कि त्वचेची छिद्रे उघडतात आणि जर तुम्ही तसेच बाहेर गेलात तर त्या मध्ये धूळ जमा होईल आणि मग त्वचा खराब होयची सुरवात होते म्हणून मी रात्री वाफ घेते आणि त्या नंतर गुलाबपाणीने त्वचा साफ करते. जर तुमच्या चेहऱ्यावर पुटकूळी आली असेल तर फक्त त्याच्या भवती कापसामध्ये गुलाबपाणी घेऊन फिरवायचे त्यांनी पुटकूळीची उष्णता ही कमी होण्यासाठी मदत होते. हे झाल्यावर मी घरात बनवलेला फेसपॅक लावते.
त्या पॅकमध्ये संत्र्याच्या सालीची पावडर, चंदन पावडर, गावची अंबी हळद, मध, कच्च दूध आणि दुधाची मलाई असेल तर, गुलाब किंवा साधं पाणी ह्या सर्व साहित्यांची छान पेस्ट बनवून चेहऱ्याला लावते आणि ती थोडी सुकायला आली आहे असे दिसले कि पाणी लावून त्याला वरच्या दिशेनी मालिश करते, खालच्या दिशेनी जर मालिश केली तर कातडी लूज पडते म्हणून नेहमी मालिश वरच्या दिशेनेच केली पाहिजे. मालिश करून झाले कि फेसपॅक पाण्यानी धुते. हिवाळ्यामध्ये जास्त वेळ जर चेहऱ्यावर फेसपॅक ठेवला आणि तो एकदम सुकून दिला तर त्वचा कोरडी पडते. फेसपॅक धुवून झाल्यावर मी गुलाबपाणी लावते काही जण तूप ही लावतात. जर या क्रिया नंतर मला अचानक बाहेर पडायचं असेल किंवा आऊटडोर शूटिंग असेल तर मी वॉटरबॅसेड सनस्क्रीन लावते जर वॉटरबॅसेड सनस्क्रीन नसेल तर चेहरा सफेद पडतो.
मला घरगुती गोष्टी जास्त आवडतात. माझ्या त्वचा आणि केसांच्या छान तब्येतीसाठी, केसांसाठी मी एक तेल घरी बनवते. मी कोकणातली आहे तर तिथून शुद्ध घाणेवरचं नारळाचं तेल आम्ही आणतो. त्या तेलात जास्वंदीची फुलं, मेथी दाणे , कांदा असेल तर उत्तम किंवा कडीपत्ता हे सगळं त्या तेलात टाकून त्याला उकाळ देते. कडीपत्त्याची पाने थोडी काळपट अशी झाली कि कळून येत आणि गॅस बंद करून थंड झाल्यावर त्याला मी एका बाटलीत ठेवते. माझे हिवाळ्यात पहिले खूप केस गळायचे पण जेव्हा पासून हे तेल वापरतेय मला फरक कळून यायला लागला.
तेल लावताना टाळूवर बोटानी हलक्यानी मालिश करते आणि मग मोट्या दातांच्या फणीने केस विंचरून त्याची वेणी घालून ठेवते म्हणजे धुताना जटा होत नाही. मी या सर्व गोष्टी स्वतःच्या त्वचा आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी करते. तुम्ही जर ह्या गोष्टींचा वापर करणार असाल तर आधी एका छोट्या भागावर चाचणी करून घ्या स्वतःच्या त्वचेवर कारण सर्वांची त्वचा वेगळी असते जर तुम्हाला कशाची ऍलर्जी असेल तर तुम्हाला कळेल आणि तसा तुम्ही या घरगुती गोष्टींचा वापर करू शकता.