जिऱ्याचे आपल्या आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे; जाणून घ्या

जिऱ्याचे आपल्या आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे; जाणून घ्या

जिऱ्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे


जिऱ्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अन्नपचन नीट होण्यासाठी जिऱ्याचा अप्रतिम उपयोग होताना दिसतो. अन्न अंगी लागणं असं जे आपण म्हणतो, त्यासाठी जिरं उपयोगी पडतं. ज्यांना काहीही खाल्ल्यानंतर शौचाला जावं लागतं, अशा वेळेला जीरं औषधाप्रमाणे उपयोगी पडतं.

जिरं मंद आचेवर थोडसं भाजून घ्यावं, खलबत्ता किंवा मिक्सरच्या मदतीने त्याची पूड करावी. जेवणाच्या सुरुवातीलाही ही पूड एक चमचा कोमट पाण्यासह किंवा ताज्या आणि लोणी काढून टाकलेल्या ताकासह घ्यावी. यामुळे आतड्याची शक्ती वाढते, अन्न पचण्यास मदत होते.

पचन मंदावलेलं असेल, भूक विशेष लागत नसेल किंवा अपचनामुळे गॅस होत असेल तर भाजी, आमटी बनवताना तूप आणि जिऱ्याची फोडणी देणं उत्तम असतं. गॅस, पोटात जडपणा, असेल तर भाजलेले जिरं, बडीशेप आणि भाजलेला ओवा समप्रमाणामध्ये आणि चवीनुसार सैंधव एकत्र करावं आणि जेवणानंतर नीट चावून खावं. काही दिवस नियमितपणे हा उपाय केला तर त्यामुळे नक्की गुण येतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com