चहामध्ये 'काळे मीठ' टाकून प्यायल्यास होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Black Salt In Tea : भारतात बहुतांश लोकांचा दिवस चहाने सुरू होतो. काही लोकांसाठी चहा हा दैनंदिन दिनचर्याचा एक आवश्यक भाग आहे. बहुतेक लोक चहामध्ये साखर घालून पितात. पण, तुम्हाला माहिती आहे का चहामध्ये मीठ टाकून प्यायल्याने खूप फायदे मिळतात. चहामध्ये मिठाचा वापर तितकासा लोकप्रिय नाही. पण जर तुम्ही आजपासून काळे मीठ टाकून चहा प्यायला सुरुवात केली तर त्यातून मिळणारे फायदे आश्चर्यचकीत करतील. चला जाणून घेऊया कोणत्या चहामध्ये काळे मीठ वापरावे आणि का?
या चहामध्ये घाला काळे मीठ
ग्रीन टी
जर तुम्ही ग्रीन टी शौकीन असेल तर त्यामध्ये काळ्या मीठाचा अवश्य समावेश करा. कारण ग्रीन टीमध्ये काळे मीठ टाकल्याने त्याचे पाचक गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट्स वाढण्यास खूप मदत होईल, म्हणजेच या चहाचा तुम्हाला अधिक फायदा होईल. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर काळे मीठ मिसळून ग्रीन टी नक्की प्या. यामुळे वजन झपाट्याने तर कमी होईलच, पण अपचन, अॅसिडिटी यांसारख्या पोटाच्या अनेक समस्याही दूर होतील.
लेमन टी
लेमन टीमध्ये काळे मीठ मिसळून प्यायल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर लेमन टीमध्ये काळे मीठ मिसळून प्या. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल. हा चहा पोटाचा चयापचय दर वाढवतो आणि आतड्याची हालचाल देखील सुलभ करतो. हा चहा प्यायल्याने तुम्ही खाल्लेला प्रत्येक पदार्थ लवकर पचतो. लेमन टीमध्ये काळे मीठ टाकून, शरीर अधिक चांगल्या प्रकारे डिटॉक्सिफिकेशन करण्यास सक्षम आहे.
ब्लॅक टी
ज्यांना ब्लॅक टीमध्ये देखील काळे मीठ देखील घालावे. कारण त्याचा तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. ब्लॅक टीमध्ये काळे मीठ टाकल्याने वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते. वास्तविक, काळे मीठ पोटातील पाचक एन्झाईम्सला चालना देण्याचे काम करते. त्यामुळे अन्न लवकर पचते आणि चरबीही कमी होते.