चहा पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीयेत का?

चहा पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीयेत का?

चहा प्यायला सर्वांनाच आवडते. अनेकदा चहा न पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चहा आपल्या शारीरिक समस्या दूर करण्यात मदत करतात.
Published on

Benefits of Tea : चहा प्यायला सर्वांनाच आवडते. लोकांच्या दिनचर्येचा तो एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकदा चहा आरोग्यदायी नसल्याचे सांगत तो न पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चहामध्ये अनेक औषधी घटक आढळतात जे आपल्या शारीरिक समस्या दूर करण्यात मदत करतात. चहा एखाद्या एनर्जी ड्रिंकपेक्षा कमी नाही. चला तर मग जाणून घेऊया चहा पिण्याचे कोणते फायदे आहेत.

चहा पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीयेत का?
बाप्पाचे आवडते मोदक खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' फायदे; जाणून घ्या

'हे' आहेत चहा पिण्याचे फायदे

अँटिऑक्सिडंटने समृद्ध

चहामध्ये वेलची, दालचिनी, आले आणि लवंगा यासारख्या घटकांचा वापर केला जातो जे सर्व त्यांच्या उच्च अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखले जातात. हे शरीरातील मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतात. यामुळे हृदयरोग, कर्करोग आणि वृद्धत्वाच्या समस्या कमी होतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

आले आणि लवंगामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो. यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. संसर्गाचा धोकाही कमी असतो.

डोकेदुखीमध्ये फायदा

काळ्या चहामध्ये कॅफिन असते यामुळे डोकेदुखीचा प्रभाव कमी होतो. एका संशोधनानुसार, एक कप चहामध्ये 50 मिलीग्राम कॅफिन असते. यामुळे आपली एकाग्रता शक्ती मजबूत होते.

मधुमेह कमी करण्यासाठी फायदेशीर

संशोधनानुसार चहामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी संतुलित प्रमाणात चहा प्यावा.

हृदयासाठी फायदेशीर

ब्लॅक टी किंवा ग्रीन टी संतुलित प्रमाणात सेवन केल्यास हृदय निरोगी राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com