Piles: मूळव्याधावर घरच्याघरी करा झटपट एक साधा उपाय; जाणून घ्या...

Piles: मूळव्याधावर घरच्याघरी करा झटपट एक साधा उपाय; जाणून घ्या...

आपल्या घरातलं स्वयंपाकघरात औषधांचा खजिना असतो. यातल्या काही उपाय अशा असतात की त्या अगदी मोठ्या औषधालाही मागे टाकू शकतात.
Published on

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

आपल्या घरातलं स्वयंपाकघरात औषधांचा खजिना असतो. यातल्या काही उपाय अशा असतात की त्या अगदी मोठ्या औषधालाही मागे टाकू शकतात. अशीच एक साधा उपाय म्हणजे लोणी, खडीसाखर आणि नागकेशर.

शौचावाटे रक्त पडत असेल, मग ते मूळव्याधमुळे असो किंवा फूटमुळे असो, एक चमचा घरी बनवलेलं ताजं लोणी, पाव चमचा नागकेशर चूर्ण आणि चवीप्रमाणे अर्धा ते एक चमचा बारीक केलेली खडीसाखर हे मिश्रण घ्या आणि लगेचच आणि चांगला गुण येताना दिसेल.

Piles: मूळव्याधावर घरच्याघरी करा झटपट एक साधा उपाय; जाणून घ्या...
Night-Flowering Jasmine: जाणून घ्या 'या' वनस्पतीची औषधी फायदे

नागकेशर हे आयुर्वेदातलं एक मोठं औषध आहे पण अनेक मसाल्यांमध्ये सुद्धा ते वापरलं जातं. नावाप्रमाणेच नागकेशर हे खरं म्हणजे फुलामधलं केशरं असतं. पण असं शुद्ध नागकेशर मिळणं खूप अवघड असतं आणि मिळालं तरी ते महागही तितकंच असतं. म्हणून तर त्याचा इतका चांगला गुण येतो ना. स्वयंपाकघर असो का फार्मसी. गुणवत्तेमध्ये तडजोड करण्याची सवय नंतर औषधपाण्यावर अनेक पटींनी खर्च करायला भाग पाडते. त्यामुळे कायम शुद्ध आणि चांगल्या गुणवत्तेच्या गोष्टी वापरणं हेच श्रेयस्कर.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com