HDFC चे विलीनीकरण...होणार सर्वात मोठी बँक
भारतातील नामांकित बँक एचडीएफसी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) चे HDFC बँकेत विलीनीकरण होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्याची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात आली. चेअरमन दीपक पारेख (Deepak Parekh) म्हणाले की, या परिवर्तनात्मक विलीनीकरणाद्वारे, एचडीएफसी बँकेतील 41 टक्के हिस्सा विकत घेईल.
येत्या दोन वर्षातील कोरोनाच्या महामारी (Covid-19) मुळे बँकिंग क्षेत्रावर (Banking Sector) याचा विपरीत परिणाम झाला आहे. शेअर मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सेन्सेक्स व निफ्टी हे दोन्ही तेजी मध्ये आहेत. तरीसुद्धा एचडीएफसी चे शेअर्स फायद्यात नाहीत. याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे तज्ञांकडून म्हटले जात आहे.
HDFC ने 4 एप्रिल रोजी सांगितले की त्यांच्या बोर्डाने त्यांच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपन्या HDFC Investment Ltd आणि HDFC Holdings Ltd चे HDFC Bank Ltd मध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. अहवालानुसार, HDFC-HDFC बँकेची विलीनीकरण प्रक्रिया आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
दीपक पारेख म्हणाले की, या विलीनीकरणामुळे एचडीएफसी बँकेला त्याचा गृह कर्ज पोर्टफोलिओ तयार करता येईल आणि सध्याचा ग्राहक वाढेल. पारेख म्हणाले की, हे समानांचे विलीनीकरण आहे. RERA ची अंमलबजावणी, गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा, सर्वांना परवडणारी घरे यासारख्या सरकारी उपक्रमांमुळे हाऊसिंग फायनान्स व्यवसाय झपाट्याने वाढेल असा आमचा विश्वास आहे