Padma Award 2022 | पद्म पुरस्कारांची यादी जाहीर; ‘या’ दिग्गजांना पुरस्कार जाहीर

Padma Award 2022 | पद्म पुरस्कारांची यादी जाहीर; ‘या’ दिग्गजांना पुरस्कार जाहीर

Published by :
Published on

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात एकूण 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात सीडीएस बिपीन रावत यांना मरणोत्तरत पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सायरस पूनावाला , बालाजी तांबे, प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, दिवंगत सीडीएस जनरल बिपीन रावत, कल्याण सिंग, सोनू निगम, सुलोचना चव्हाण, डॉ. हिम्मतरावर बावस्कर आदींचा सन्मान करण्यात आला आहे. त्याचबरोबर सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनाही पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.त्याचबरोबर कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्म विभूषण, गायक सोनू निगमला पद्मश्री, आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्म विभूषण पुरस्कार :

  • सीडीएस जनरल बिपीन रावत (मरणोत्तर)
  • प्रभा अत्रे – कला
  • कल्याण सिंह (मरणोत्तर)
  • राधेश्याम खेमका (मरणोत्तर)

पद्म भूषण पुरस्कार :

  • सायरस पुनावाला – व्यापार आणि उद्योग
  • नटराजन चंद्रशेखरन – व्यापार आणि उद्योग
  • सत्या नडेला
  • सुंदर पिचाई
  • गुलाम नबी आझाद

पद्मश्री पुरस्कार :

  • बाळाजी तांबे (मरणोत्तर)
  • विजयकुमार डोंगरे
  • सुलोचना चव्हाण
  • नीरज चोप्रा
  • डॉ. हिम्मतराव बावस्कर
  • सोनू निगम
  • अनिल राजवंशी
  • भिमसेन सिंगल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com