सोने- चांदीच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजची किंमत
सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. गुरुवारी भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची वायदे किंमत कमी होऊन 46,377 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर देखील गुरुवारी कमी झाले आहेत. नवी दिल्ली आणि मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे 46,000 रुपये आणि 45,360 रुपये प्रति तोळा आहे. वेबसाइटच्या मते चेन्नईमध्ये हा दर 44,110 रुपये प्रति तोळा आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,180 रुपये प्रति तोळा आहे तर मुंबईत सोन्याचा दर 46,360 रुपये प्रति तोळा आहे.
तज्ञांच्या मते, MCX वर सोने 46800-47055 च्या दरम्यान राहू शकते. दुसरीकडे, चांदी 61000-61400 च्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे. 61200 च्या उद्दिष्टासाठी 59400 च्या स्टॉप लॉससह तज्ञ 59,900 च्या जवळ चांदी खरेदी करण्याचे सुचवत आहेत. अलीकडच्या काही महिन्यातील ही चांदीतील सर्वाधिक घसरण आहे. एमसीएक्सवर चांदीच्या दरात 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर स्थिर बंद झाले होते तर चांदी 1.2 टक्क्यांनी वधारली होती. सराफा बाजारात गेल्या आठवडाभरात रेड झोन आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. स्पॉट गोल्डची किंमत 0.3 टक्क्यांच्या घसरणीनंतर 1,762.33 डॉलर प्रति औंस झाली आहे. डॉलर इंडेक्स एका महिन्याच्या उच्च स्तरावर आहे. बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार तुमच्या शहरातील भाव गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते, गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 46,360 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदीचे दर 1100 रुपयांच्या तेजीनंतर 60,900 रुपये प्रति किलोवर आहेत.