”माझं नाही संपूर्ण देशाचं सुवर्ण पदक”
"हे सुवर्णपदक माझं नाही संपूर्ण देशाचं आहे", "मी खिशात मेडल घेऊन त्या दिवसापासून फिरतोय", असे उद्गार भारतासाठी टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने काढले आहेत. दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये खेळाडूंच्या सत्कार समारंभात तो बोल्त होता. याप्रंसगी क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री आणि माजी क्रीडामंत्री किरेन रिजीजू उपस्थित होते.
भारताने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ७ पदक पटकावली आहे. त्यात एक सुवर्ण पदकाचा समावेश आहे. सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.गोल्डन बॉय नीरज चोप्राने मंचावर आल्यानंतर सर्वांना सुवर्ण पदक दाखवलं. "ज्या दिवसांपासून पदक माझ्या खिशात आलं आहे. त्या दिवसापासून मी काही खाऊ शकलो नाही की, झोपू शकलो नाही. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद", असं नीरज चोप्रा याने सांगितलं.