Tokiyo olympic । सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा मायदेशात

Tokiyo olympic । सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा मायदेशात

Published by :
Published on

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा मायदेशी परतला आहे. नीरज भारतात परतल्यानंतर त्याचं विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर, तो येथून थेट दिल्ली कॅंट परिसरात असलेल्या राज्रीफ स्पोर्ट्स सेंटरला जाईल. दरम्यान टोकिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने ७ पदके पटकावली आहेत. यामध्ये एक सुवर्णपदक, दोन रौप्य आणि 4 कांस्यपदक पटकावली आहेत.

"देशवासियांचे प्रेम पाहून खूप छान वाटले"

कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आज भारतात दाखल झाला आहे. यावेळी दिल्ली विमानतळावर त्यांचे जल्लोषाचे स्वागत करण्यात आले.यावेळी देशवासियांचा प्रेम आणि आदर मिळाल्याने खूप छान वाटतं, असल्याचं बजरंग पुनिया यावेळी म्हणाला.

टोकियो ऑलिम्पिकच्या समारोपानंतर आज भारताचे खेळाडू ऑलिम्पिक व्हिलेजमधून मायदेशी परतले आहेत. पदकविजेत्या भारतीय खेळाडूंचा दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये सन्मान केला जाणार आहे. आधी हा सत्कार समारंभ मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडिअममध्ये होणार होता, मात्र खराब वातावरणामुळे हा समारंभ अशोका हॉटेलमध्ये आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com