Ganesh Chaturthi 2021 | जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त
आज लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापनेचा शुभ मुहूर्त काय ते जाणून घ्या –
गणपती स्थापनेची शुभ मुहूर्त
10 सप्टेंबर 2021 रोजी, शुक्रवारी गणेश चतुर्थी सण आहे. या दिवशी जर तुम्ही शुभ मुहूर्तावर गणपतीची स्थापना केली तर ते तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 12:17 ते रात्री 10 पर्यंत असेल. त्यामुळे तुम्ही 10 सप्टेंबरला रात्री 12 नंतर कोणत्याही वेळी गणपतीची स्थापना आणि पूजा करु शकता.
यावर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीला निरोप दिला जातो. या वर्षी चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरु होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत असेल. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्तही जाणून घ्या-
सकाळचा मुहूर्त – 7:39 ते 12:14 पर्यंत
दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत
संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46
रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)
सकाळचा मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)
बाप्पाला प्रसन्न करण्यासाटी या मंत्रांचा जप करा –
- ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात..
- ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश.
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति. मेरे कर दूर क्लेश..