सलग १२व्या दिवशी इंधनमध्ये दरवाढ; सामान्य नागरिक त्रस्त
जागतिक बाजारात कच्च्या`तेलाच्या किमतीत वाढ होत असून त्याचा भार सामान्य ग्राहकांच्या माथी मारण्याची भूमिका पेट्रोलियम कंपन्यांकडून चोखपणे बजावण्यात येत आहे. आज सलग १२ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. आज देशभरात पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैशांनी महागले.
देशभरात अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर १०० रुपये लिटरच्या पुढे गेले आहेत. तर काही ठिकाणी पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. मागील आठवड्यात इंधनाच्या दरात सतत वाढ झाली. पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन देशभरात संतापाचे वातावरण आहे. देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. शनिवारीही देशात इंधनाचे दर चढेच राहिले. देशभरातील अनेक जिल्ह्यात पेट्रोलचे दर १०० रुपये लिटरच्या पुढे गेले आहेत. तर काही ठिकाणी पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. मागील आठवड्यात इंधनाच्या दरात सतत वाढ झाली.
विविध जिल्ह्यातील इंधनाचे दर (प्रति लिटर) –
- परभणी – पेट्रोल 99.01 डिझेल – 88.39
- औरंगाबाद – पेट्रोल 97.48 डिझेल – 86.80
- रत्नागिरी – पेट्रोल – 98.22 डिझेल – 87.89
- हिंगोली – पेट्रोल- 97. 87 स्पीड पेट्रोल- 100. 70 डिझेल-87. 59
- नंदुरबार – पेट्रोल – 97.65 स्पीड पेट्रोल – 100.48 डिझेल – 87.39
- जळगाव – पेट्रोल 98.05 डिझेल 87.74