russia ukraine war | भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी नरेंद्र मोदींनी घेतला ‘हा’ निर्णय
रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे ( russia ukraine war ) शेकडो भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. यात बहुतेक करून विद्यार्थी आहेत. यामुळे भारताकडून नागरिकांना सुरक्षित आणि सुखरुप मायदेशात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचपार्श्वभूमीवर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी( pm modi calls a high level meeting ) यांच्या अध्यक्षतेखाली युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक झाली. काही केंद्रीय मंत्र्यांना भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी समन्वय साधण्यासाठी युक्रेनच्या शेजारी देशांत पाठवणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग हे स्थलांतर मिशनमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार आहेत. युक्रेनमधील परिस्थितीदरम्यान एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे.
गुजरातमधील सुमारे 100 विद्यार्थी सोमवारी सकाळी गांधीनगरला पोहोचले. सीएम भूपेंद्र पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. हे विद्यार्थी युक्रेनमधून मुंबई आणि दिल्लीत उतरले आणि त्यांना व्होल्वो बसने गुजरातला आणले. युक्रेनमधून दिल्लीत आलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, सरकारने आम्हाला खूप मदत केली. भारतीय दूतावासाकडून शक्य ती सर्व मदत करण्यात आली. सर्वात मोठी समस्या म्हणजे सीमा ओलांडणे. मला आशा आहे की, सर्व भारतीयांना परत आणले जाईल. अजून अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकलेत.
युक्रेन संकटावर शरद पवार यांची परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली आणि खारकिव, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत चर्चा केली. त्यांनी बेल्गोरोड (रशिया) मार्गाने बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर आणि रोमानिया-पोलंड सीमेवर अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याबाबतही माहिती दिली.