भारताबाहेरील गणपतीची रूपे
बाप्पाच आगमन झाले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची ख्याती फक्त भारतात नसून संपूर्ण जगभर पाहायला मिळते. गुप्तयुगातील गणेशमूर्ती अष्टभूज किंवा दशभूज असल्याचे पाहायला मिळतात. तंत्रसार या ग्रंथानुसार काश्मीर, नेपाळ आणि अफगाणिस्तानात गणेशाचे वाहन सिंह दाखवण्यात आले आहे. महागणपती हे गणपतीचे विराट रूप आहे. त्यात शक्ती विराजमान असते.
हेरम्ब गणपती – तंत्रसार ग्रंथात हेरम्ब गणपतीचा ल्लेख आहे. गणेशाचे हे रूप पंचानन अर्थात पाच तोंडी आहे. त्यातले एक तोंड उर्ध्वदिशी अर्थात आकाशाकडे केलेले असते. या गणेशाचे वाहन सिंह असते. नेपाळमध्ये गणेशाचे वाहन उंदीरही दाखवलेले असते.
नृत्यगणेश – नृत्यगणेश आठ हातांचा आणि नृत्यरत या गणेशाच्या हाती शस्त्र नसते. मुद्रा नृत्यमग्नतेची असते.
विनायक गणेश – विनायक गणेशाचा उल्लेख ग्निपुराण ग्रंथात आढळतो. चिंतामणी विनायक, कपर्दी विनायक, आशा विनायक, गजविनायक व सिद्धिविनायक अशी याची पाच रूपे आढळतात.
बौद्ध गणेश – बौद्ध साधनमाला या ग्रंथात बौद्ध उल्लेख आढळतो. तो द्वादशभूत अर्थात बारा हाती आहे. याचे कपाळ रक्तवर्णी असते.