‘मान्सून’ उशिरा करणार परतीचा प्रवास
यंदा देशातील मान्सूनचा परतीचा प्रवास तब्बल २० दिवस उशिरा सुरू होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. 1 जूनला या पावसाला सुरूवात होऊन जून ते सप्टेंबर कालावधीत देशभरात सर्वसाधारण सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे. यामुळे होणाऱ्या परतीच्या पावसाविषयी चार आठवड्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आहे.
पहिल्या आठवड्यात देशाच्या पश्चिम, वायव्य आणि या भागांच्या आजूबाजूच्या मध्य भारतातील बहुतेक प्रदेशांमध्ये सर्वसाधारण प्रमाणाहून अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुसऱ्या आठवड्यात देशाच्या मध्य भागातील राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण सर्वसाधारण प्रमाणाहून जास्त राहील. तर, वायव्य भागात हे प्रमाण सर्वसाधारण असेल.
मान्सून ब्रेक झाल्याने परतीचा पाऊस महिनाभर लांबणीवर गेला आहे. त्यामुळे यंदा 6 ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस सुरु होईल. यातच पावसाच्या हंगामात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याचं भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, आता शाहीन चक्रीवादळाचा फटका गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याला बसण्याची शक्यता आहे. शाहिन चक्रीवादळामुळे आता हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. के. जेनमानी यांनी म्हटले की, 3 ऑक्टोबरपर्यंत ही स्थिती कायम राहिल.