मध्य प्रदेशात पुराचा कहर; NDRF, SDRF सहीत लष्कराच्या चार कॉलमची मागणी

मध्य प्रदेशात पुराचा कहर; NDRF, SDRF सहीत लष्कराच्या चार कॉलमची मागणी

Published by :
Published on

मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. इथल्या जवळपास २०० गावांना पुरानं मोडीत जवळपास काढलंय तर २२ गावं पाण्याखाली आहेत. प्रशासनाचे परिस्थितीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांचे प्रयत्न सुरू असतानाच आता भारतीय लष्करालाही पाचारण करण्यात आल.

आमचे दोन मंत्री शिवपुरीमध्ये कंट्रोल रुम बनवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भारतीय लष्कराच्या चार कॉलमची मागणी आहे. एका कॉलममध्ये लष्कराचे ८० जवान सहभागी असतात. लष्कर पाठवणं योग्य राहील, असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय.

शिवपुरी जिल्ह्यात गेल्या काही तासांत ८०० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलीय. २६ जुलै २००५ रोजी मुंबईला पावसानं दणका दिला होता तेव्हा ९४४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती, यावरून परिस्थितीचा अंदाज येऊ शकेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com