Truck with the Mangoes to be exported
Truck with the Mangoes to be exported

हापूस आणि केशर आंब्याची पहिली खेप टोकीयो येथे आंबा महोत्सवासाठी जपानला निर्यात

Published by :
Vikrant Shinde
Published on

महाराष्ट्र (Maharashtra) त्यातही विशेष करून कोकण (Kokan) प्रांत हा आंब्याच्या (Mangoes) उत्पादनासाठी मोठा प्रसिद्ध आहे. या भागातून हापूस, केशर, तोतापुरी, लंगडा अशा विविध जातीच्या आंब्याचं पीक घेतलं जातं. दरवर्षी यातील आंब्यांची मोठी संख्या विदेशामध्ये निर्यात (Exported Mangoes) केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जपान येथील टोकीयो (Tokiyo city in Japan) या शहरात आंबा महोत्सवाचे (Mango Festival at Tokiyo) आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने हापूस आणि केशर आंब्याची हंगामातील पहिली खेप जपानला निर्यात झाली.

निर्यातीला चालना देत, कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) यंदाच्या हंगामातील हापूस आणि केशर आंब्यांची पहिली खेप निर्यात केली. अपेडाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स बेरीडेल फूड्स (ओपीसी-OPC) प्रा.लि. यांनी जपनाच्या लॉसन रिटेल चेनकडे हापूस आणि केशर आंबा निर्यात केला. निर्यात केलेले आंबे अपेडा मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने (MSAMB) प्रक्रिया करून पॅकिंग केले आहेत.

अपेडाने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून व्यापार मेळे (Trade Fairs), शेतकऱ्यांसाठी पोर्टल, ई-ऑफिस, हॉर्टिनेट ट्रेसेबिलिटी सिस्टम, खरेदी-विक्री मेळावा, उत्पादन केंद्री मेळावे अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com