Fire caught in sugarcane Farm at Latur
Fire caught in sugarcane Farm at Latur

तब्बल 20 एकर ऊसाला आग… शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान

Published by :
Vikrant Shinde
Published on

लातूर (Latur) जिल्ह्यात ऊसाचं (Sugarcane) उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाच्या मोठ्या साधनांपैकी एक म्हणजे, उसाचं पीक घेऊन तो ऊस साखर कारखान्यांना (Sugar Factories) विकणे. मात्र सध्या जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची (Sugarcane Producer Farmers) चिंता वाढली आहे. वाढते तापमान, कारखान्यांकडून उसाच्या खरेदीला होणारी दिरंगाई ही चिंता वाढवणारी काही कारणं आहेत. त्यातंच आता जिल्ह्यात शेतात ऊभ्या असलेल्या ऊसाला आग लागण्याचं प्रमाणही वाढतंय.

लातूर जिल्ह्यातील औसा (Ausa) तालुक्यातील शिवणी शिवार परीसरात तब्बल 15 एकर ऊसाला आग लागली तर, जळकोट (Jalkot) तालूक्यातील हावरगा परीसरात जवळपास 12 एकर ऊसाला आग लागली. त्यामूळे, शेकऱ्यांचं मोठं नूकसान झालं आहे.

शेकऱ्यांचं प्रचंड नूकसान:
दरम्यान, ह्या आगीत केवळ ऊसाच्या पीकाचंच नव्हे तर, शेतातील शेतीसाठीच्या इतर सामग्रीचेही (Farming Equipments) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीसाठी वापरले जाणारे पाईप्सचा ह्या सामग्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश होता. ह्या संपूर्ण घटनेत पीक व सामग्रीचं झालेलं नूकसान लक्षात घेतलं तर, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com