Mumbai
Sameer Wankhede | समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना कमी वयात मद्यविक्रीचा परवाना मिळविल्याचे प्रकरण भोवण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांनी खोटी माहिती देऊन मद्य विक्रीचा परवाना मिळवला असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. त्यानंतर वानखेडेंविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सद्गुरू बारचा परवाना कमी वयात घेतल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने आयआरएस समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.फसवणूक, बनावट कागदपत्रे, वस्तुस्थितीशी छेडछाड, चुकीची माहिती देणे यासह अनेक प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल करण्याक आला आहे.
समीर वानखेडेंचा वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.