फेसबुकची आता ‘ही’ योजना होणार कमी
लोकशाही न्यूज नेटवर्क
फेसबुकने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार जगभरातील लोक राजकीय कंटेट जास्त पाहत नाही असे निकष समोर आले आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या सेवेत बदल करायची योजना करत आहोत,अशी माहिती फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी दिली.
मार्क झुकरबर्ग म्हणाले, "आम्ही आमच्या कम्युनिटीकडून फीडबॅक घेतला आहे. जे ऐकल्यानंतर असे दिसून आले आहे की, लोक आता राजकीय कंटेट पाहणे पसंत करत नाहीत. त्यामुळे आम्ही आपल्या सेवेत बदल करण्याचा प्लॅन करत आहेत."
अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या ऑक्टोबरमध्ये अमेरिकन युजर्संना या राजकीय ग्रुप्सना शिफारस करण्यापासून रोखण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. फेसबुक कम्युनिटीकडून घेतलेल्या फीडबॅकमध्ये जगभरातील बहुतांश लोक राजकीय कंटेट जास्त पाहत नाहीत.
२०२० च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला चांगला नफा मिळाला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीने ११.२२ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. कोरोना संकट काळात लोक घरातच असल्यामुळे फेसबुक राहिल्यामुळे फेसबुक युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय, डिजिटल जाहिरातींमधून मिळणारा महसूलही वाढला आहे. फॅक्टसॅटने केलेल्या सर्वेक्षणात विश्लेषकांनी असे म्हटले आहे की, फेसबुकने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ११.२२ अब्ज डॉलर नफा कमावला आहे.