Gujrat Titans Vs. Lucknow SuperGiants
Gujrat Titans Vs. Lucknow SuperGiants

IPL 2022: गुजरात विरूद्ध लखनौ सामन्यात ‘या 3’ खेळाडूंच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष…

Published by :
Vikrant Shinde
Published on

IPL च्या 15व्या (IPL 2022) हंगामाला आता सुरूवात झाली असून सामन्यांची रंगत आता चांगलीच वाढू लागली आहे. यंदाच्या हंगामातील 3 सामने पार पडले आहेत. आजचा सामना हा लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध गुजरात टायटन्स (Lucknow Super Giants Vs. Gujrat Titans) असा असणार आहे. हे दोन्ही संघ यंदाच्या वर्षीच नव्याने IPL च्या स्पर्धेत उतरले असल्याने ह्या सामन्याची रंगत आणखी वाढणार आहे.

दरम्यान, IPL मध्ये नव्याने सामिल झालेल्या ह्या दोन्ही संघांनी चांगले व नावाजलेले खेळाडू आपल्या संघात यावेत ह्या करीता बराच पैसा खर्च केला आहे. त्यापैकीच अनेक खेळाडूंकडे आज सर्वच क्रीकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.

हार्दिक पंड्या:
मागील हंगामापर्यंत मुंबईच्या (Mumbai Indians) संघाचा अगदी अविभाज्य भाग समजला जाणारा व आपल्या आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यंदाच्या वर्षी मात्र गुजरात टायटन्सचं नेतृत्त्व (Gujrat Titans Captain) करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे, मागील साधारण वर्षभरापासून फिटनेसच्या कारणाने क्रीकेटच्या मैदानाबाहेर असलेला हार्दिक एक खेळाडू म्हणून आणि त्याहीपेक्षा जास्त एक कर्णधार म्हणून काय कामगिरी करणार हे पाहणं गरजेचं आहे.

राशिद खान:
अफगानिस्तानचा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज राशिद खान (Afghani Player Rashid Khan) यंदाच्या हंगामात गुजरातच्या संघाकडून गोलंदाजी (Gujrat's Bowler) करताना दिसणार आहे. मागील हंगामात हैद्राबादच्या (Sunrisers Hyderabad) संघासाठी गोलंदाजी करताना चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे, यंदा नव्या संघासाठी राशिद खान काय कामगिरी करणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं आहे.

के एल राहूल:
उत्कृष्ट फलंदाज व विकेटकीपर के एल राहूल (Batsman-Wicketkeeper K. L. Rahul) यंदा लखनौच्या संघाचं नेतृत्त्व करताना दिसणार आहे. तर, यंदाच्या हंगामात राहूल कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत लखनौच्या संघाला कुठेपर्यंत घेऊन जातोय याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com