‘इंधन दर कमी करता येणार नाही’-पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

‘इंधन दर कमी करता येणार नाही’-पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

Published by :
Published on

देशभरात पेट्रोलच्या किमतीनी शंभरी पार केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिवसागणिक वाढ होत असल्याने विरोधीपक्षाने केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. पेट्रोल दरवाढी विरोधात काँग्रेस देशभरात आंदोलन करत असताना, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी "सरकारचं उत्पन्न बरंच कमी झालं आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात उत्पन्न कमी राहिलंय आणि २०२१-२२ मध्येही कमी राहण्याची शक्यता आहे. सरकारचे उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. त्यामुळे इंधन दर आता कमी करता येणार नाहीत," असं म्हंटलं आहे.

राहुल गांधींनी इंधन दर वाढीवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं की, "त्यांचा पक्ष सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात इंधन दरात वाढ का आहे? या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींनी आधी द्यावं. राजस्थान, पंजाबमध्ये का इंधन दर वाढ झालेली आहे? अशी बेजबाबदार वक्तव्य राहुल गांधींच करू शकतात."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com