India
Sundar Lal Bahuguna Death: चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचं कोरोनाने निधन
चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि 'हिमालयाचे रक्षक' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचं आज कोरोनाशी लढताना निधन झालं. बहुगुणा हे 94 वर्षाचे होते.
सुंदरलाल बहुगुणा यांना 8 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बहुगुणा हे 94 वर्षाचे होते. त्यांच्या निधनावर उतराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.