Satyavan Savitri
Satyavan SavitriTeam Lokshahi

Satyavan Savitri : झी मराठीवरील नवी मालिका ‘सत्यवान सावित्री’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

आपल्या प्रेमावरील अतूट विश्वासाच्या जोरावर साक्षात यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची गोष्ट लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
Published by :
Published on

विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट वटपौर्णिमेचा व्रत करतात. वटपौर्णिमेच्या व्रतामागे सत्यवान आणि सावित्री यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा आहे. ही कथा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. आता हीच कथा मालिकेच्या स्वरूपात प्रेक्षक लवकरच पाहू शकतील. झी मराठीवर (zee marathi) 'सत्यवान सावित्री' (Satyavan Savitri) ही पौराणिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

तिची ही प्रेरणादायी गोष्ट तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, या हेतूने झी मराठी वाहिनीने ही कथा दैनंदिन मालिकेतून सादर करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. नेहमीच प्रयोगशील आणि वेगळ्या विचार करणाऱ्या झी मराठी वाहिनीची ही कलाकृती प्रेक्षकांना नक्की आवडणार आहे.

या मालिकेचा प्रोमो नुकताच आऊट (Promo out) झाला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना मालिकेबद्दलची उत्सुकता लागली आहे. ही मालिका लवकरच वाहिनीवर प्रदर्शित होणार असून त्यात सत्यवान आणि सावित्रीची प्रमुख भूमिका कोण निभावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोमध्ये एक मोठा वटवृक्ष दिसून येत आहे. सोबतच सत्यवान-सावित्रीची कथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रोमो पाहिल्यानंतर आता कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असा प्रश्नही प्रेक्षकांमध्ये उपस्थित केला जात आहे.

Satyavan Savitri
महेश मांजरेकरांकडून महाराष्ट्र दिनी नव्या चित्रपटाची घोषणा

या मालिकेची निर्मिती ‘द फिल्म क्लिक’ यांनी केली असून आदित्य दुर्वे (Aditya Durve) आणि वेदांगी कुलकर्णी (Vedangi Kulkarni) हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेचा प्रोमो नुकतंच प्रेक्षकांनी पाहिला आणि प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. सत्यवान-सावित्रीचं असीम प्रेम आणि सावित्रीचा सामान्यातून असामान्य प्रवास कसा होता, हे पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी सत्यवान-सावित्री ही मालिका झी मराठीवर १२ जूनपासून संध्याकाळी ७ वाजता येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com