अमिताभ बच्चन यांच्या लग्नादरम्यान जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ का व्यक्त केली 'ही' निराशाजनक भावना?
बिग बी म्हणून ज्यांना ओळखले जाते असे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा विवाह अभिनेत्री जया भादुरी यांच्यासोबत अगदी साध्या पद्धतीने पार पडला. कारण त्यावेळी अमिताभ बच्चन ‘सौदागर’ आणि ‘जंजीर’ यासारखे चित्रपट करून स्टार बनले होते. ज्यामुळे त्यांचा चाहतावर्ग देखील मोठ्या संख्येने वाढला होता. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न ३ जून १९७३ रोजी झाले आणि आता यांच्या लग्नाला ५१ वर्षे झाली आहेत. या दोघांच्या विवाहसोहळ्याला जास्त लोकांची उपस्थिती नव्हती. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नादरम्यान अमिताभ बच्चन यांचे वडील आणि कवी हरिवंशराय बच्चन यांनी एक बातमी उघड केली आहे.
कवी हरिवंशराय बच्चन यांनी अमिताभ व जया यांच्या लग्नासंबंधी ‘इन द आफ्टरनून ऑफ टाइम’ हे आत्मचरित्र लिहले. या पुस्तकात असं लिहलं होत की, जया यांच्या कुटुंबियांनी लग्नाचा कार्यक्रम त्यांच्या फ्लॅटमध्ये न ठेवता मलबार हिल्समध्ये त्यांच्या एका मित्राच्या घरी पार पाडायचे ठरवले. ज्यामुळे या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींची उपस्थिती नव्हती. यापुढे त्यांनी या पुस्तकात असे लिहले की, जयाच्या आई-वडिलांना बंगाली पद्धतीने लग्न व्हावं असं वाटत होतं, ज्यावर आमचा कोणताही आक्षेप नव्हता. पण बीच हाऊसमध्ये झालेल्या वर-पूजेत वधूशिवाय म्हणजे जया बच्चनशिवाय इतर कोणीही आनंदी दिसत नव्हते.
हळदी समारंभादरम्यान देखील बच्चन कुटुंबीयांचे स्वागत साधेपणाने करण्यात आले होते. मात्र ज्यावेळेस बच्चन कुटुंबीय लिफ्टने वर गेले त्यावेळेस जया बच्चन नववधूच्या पोशाखात लाजताना दिसली त्यावेळेस त्यांना जाणवलं की हा सौंदर्याचा एक खास पैलू आहे असे त्यावेळेस जया भादुरी यांच्याकडे पाहून त्यांना वाटले. असं त्यांनी त्यांच्या पुस्तकातून सांगितले. लग्नसोहळा उरकल्यानंतर कुटुंबातील सगळे तिथेच थांबले होते. त्यावेळेस अमिताभ बच्चन यांचे वडील कवी हरिवंशराय बच्चन हे जया बच्चन यांच्या वडिलांना भेटायला गेले आणि भेटून अमितसारखा जावई मिळाल्याबद्दल जया बच्चन यांच्या वडिलांचे अभिनंदन केले. परंतु याउलट जया बच्चन यांचे वडिल म्हणाले ‘माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे’ याचा उल्लेख हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या लिहलेल्या पुस्तकात केला आहे.