Nitin Desai : दापोलीत जन्म, मुंबईत शिक्षण, अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन; कोण होते नितीन देसाई?

Nitin Desai : दापोलीत जन्म, मुंबईत शिक्षण, अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन; कोण होते नितीन देसाई?

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे.
Published on

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. एन. डी स्टुडिओमध्ये संपवल स्वत:चे जीवन. हिंदी, मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केलं. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. २००५ मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळील कर्जत येथे एनडी स्टुडिओ सुरु केला.

नितीन देसाई यांचा जन्म दापोलीत 9 ऑगस्ट 1965 रोजी झाला. ते निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेतेही होते. अनेक सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कलादिग्दर्शन केलं आहे. नितीन देसाई यांचं संपूर्ण नाव नितीन चंद्रकांत देसाई. जोधा अकबर', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान' 'प्रेम रतन धन पायो' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन त्यांनी केलं. देसाई अनेक सरकारी कार्यक्रमाचं आयोजन देखील करायचे. अनेक शिवकालीन मालिकांचे कला दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. नितीन देसाई यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे. देसाईंनी त्यांच्या शाळेत वामनराव मुरंजन हायस्कूल, मुलुंड येथे मराठी माध्यमात शिक्षण घेतले होते. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि एल. एस. राहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाश चित्रणाचे प्रशिक्षण घेतले होते. 1987 साली त्यांनी चित्रपट सृष्टीमधील कारकीर्द सुरूवात केली.

वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. कलादिग्दर्शनामध्ये यश मिळाल्यानंतर नितीन देसाई यांनी सिनेमांच्या आणि मालिकांच्या निर्मितीकडे मोर्चा वळवला. 

नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केलेले चित्रपट

- परिंदा (1989)

- 1941- ओ लव्ह स्टोरी (1993)

- आ गले लग जा (1994)

- अकेले हम अकेले तुम (1995)

- खामोशीः द म्युझिकल (1996)

- दिलजले (1996)

- माचीस (1996)

- इश्क (1997)

- प्यार तो होना ही था (1998)

- हम दिल दे चुके सनम (1999)

- बादशहा (1999)

- जोश (2000)

- मिशन कश्मीर (2000)

- वन टू का फोर (2001)

- द लेजेन्ट ऑफ भगतसिंग (20002)

- मुन्नाभाई एम.बी.बी.एस. (2003)

- लगे रहो मुन्नाभाई (2006)

- धन धना धन गोल (2007)

- गॉड तुस्सी ग्रेट हो (2008)

- दोस्ताना (2008)

- वन्स अपॉन टाइम्स इन मुंबई (2009)

- बालगंधर्व (2011)

Nitin Desai : दापोलीत जन्म, मुंबईत शिक्षण, अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन; कोण होते नितीन देसाई?
Nitin Desai : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com